महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक जगदीश मिनीयार आणि जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त आशिमा मित्तल यांनी गुरुवार दि. 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन सविस्तर पाहणी केली. या पाहणीदरम्यान मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, मतदारांसाठी आवश्यक सोयी तसेच निवडणूक प्रक्रियेची अंमलबजावणी याबाबतची तयारी तपासण्यात आली.