राधानगरी: पाटपन्हाळा येथे बिबट्याचा हल्ला; पाच शेळ्यांचा फडशा, शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण
राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा परिसरात बिबट्याने पाच शेळ्यांचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे परिसरातील शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.शेतकरी शिवाजी बाबू बोडके यांनी मागील आठवड्यात त्यांच्या पाच शेळ्या बिबट्याने खाल्ल्या आहेत. दरम्यान वन विभागाने पंचनामा केला आहे नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन केलं आहे. अशी माहिती आज मंगळवार 22 जुलै दुपारी साडेतीनच्या दरम्यान देण्यात आली.