ऐन कडाक्याच्या थंडीत धरणगाव तालुक्यातील चावलखेडे येथील विधवा भगिनी शोभाबाई दिलीप अहिरे यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. बेघर वस्तीतील त्यांच्या झोपडीला अचानक आग लागल्याने त्यांचा संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे. रविवारी ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.