महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजे दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात असून त्यांनी दौऱ्या दरम्यान त्यांनी खामगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे पोहोचून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारअर्पण करून पूजा अर्चना केली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विजयी होण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, "आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करायचे आहे.