राधानगरी: राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील पाटबंधारे विभागाची वृक्षतोड मनमानी, नागरिकांची चौकशीची मागणी
राधानगरी तालुक्यातील टिटवे गावाजवळील अर्जुनवाडा रस्त्यावर असलेल्या दोन धोकादायक झाडांबाबत टिटवे ग्रामपंचायतीने लेखी पत्राद्वारे पाटबंधारे विभागाला तोड करण्याची विनंती केली होती मात्र या मागणीच्या अधिकाऱ्यांनी मनमानी करत अनेक झाडांची कत्तल करून लाकूड तस्करांशी संगणमत करून विकली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधित तस्करांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी आज मंगळवार दिनांक 22 जुलै दुपारी तीन च्या दरम्यान ग्रामस्थांकडून करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपाचं खंडन केलं आहे.