युवक, युवती तसेच महिला आणि पुरुष नागरिकांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आज सकाळी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. सकाळी साडेसहा वाजता मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणातून वॉकेथॉनला प्रारंभ झाला. ही वॉकेथॉन तिक्ष्णगत फाउंडेशन यांच्या पुढाकाराने तसेच राज्य बालहक्क संरक्षण आयोग आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.या वॉकेथॉनमध्ये राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत उपस्थित होते.