बार्शी: रक्ताने भिजलेलं रस्त्यावरचं दृश्य; काळेगाव पाटीजवळ भीषण अपघाताची खळबळ
बार्शी-सोलापूर महामार्गावरील वैरागपासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या काळेगाव पाटीजवळ सोमवारी रात्री ८ च्या सुमारास अपघात घडला. शिवार हॉटेलजवळ अज्ञात वाहनाने भरधाव वेगात एका तरुणाला जोरदार धडक दिली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. अपघातानंतर आरोपी वाहनचालक फरार झाला असून वैराग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या तरुणाला तातडीने बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलकडे उपचारासाठी हलवले. तरुणाची प्रकृती चिंताजनक असून पोलिसांनी फरार वाहनाचा शोध सुरू आहे.