जालना शहरात ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाची दोन लाखाहून अधिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बधुवार दि. 7 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी प्रमेश्वर पांडुरंग नानोटे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, प्रमेश्वर नानोटे हे काकडे रोड, जालना येथे ट्रान्सपोर्ट व्यवसाय करतात. त्यांच्याकडे ट्रक क्रमांक एमएच 21 बीएच 5916 असून, सदर ट्रकद्वारे एमआयडीसी जालना येथील स्टील कंपन्यांचा लोखंडी सळईचा माल विविध ठिकाणी पाठविला जातो.