अकोला शहरातील पातूर रोडवरील पॉवर हाऊससमोर आज मोठा रस्ता अपघात घडला. वेगात असलेल्या चारचाकी वाहनाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याने स्कॉर्पियो आणि बोलेरो या दोन वाहनांची जोरदार धडक झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि वाहनातील प्रवासी थोडक्यात बचावले. दोन्ही वाहने पातूरच्या दिशेने जात असताना ओव्हरटेकदरम्यान चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. धडकेनंतर काही काळ रस्त्यावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.