गेवराई नगर परिषद निवडणुकीत बोगस मतदानाचा गंभीर आरोप समोर आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुकाप्रमुख उद्धव मड यांनी माध्यमांशी बोलताना हा आरोप केला. ते म्हणाले की, “गेवराई तालुक्यात अनेक मतदारांनी डबल मतदान केले आहे. काही ठिकाणी संशयास्पद हालचाली दिसून आल्या असून मतदान प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.” उद्धव मड यांनी प्रशासनाकडे या बाबत तपास व तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, “जोपर्यंत डबल मतदान करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्हीशांत