बार्शी नगरपालिका आरक्षण सोडतीत झालेल्या त्रुटीबाबत नगरसेवक नागेश अक्कलकोटे यांनी ८ रोजी दुपारी ४ च्या सुमारास संवाद साधला. प्रभाग क्र. १६ मधील एसटी महिला आरक्षणात प्रशासनाकडून चूक झाली असून ती मान्य करून माफीही मागितली आहे. या प्रभागासाठी एसटी पुरुष, एसटी सर्वसाधारण आणि एसटी महिला अशा तीन चिठ्ठ्या टाकल्याने गोंधळ निर्माण झाला होता. अक्कलकोटे यांनी ही चूक निदर्शनास आणल्याचे सांगत, पूर्वीच्या परिपत्रकानुसार आरक्षणात सातत्य राखणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.