समुद्रपूर: रमजान ईद, राम जन्मोत्सव व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पोलिसांचा गिरड येथे रुटमार्च
रमजान ईद, राम जन्मोत्सव व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने गिरड पोलिसांनी गिरड गावातील मुख्य मार्गाने रुटमार्च काढला. हा रुटमार्च जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदिप गाडे नेतृत्वात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवान उपस्थितीत काढला.