चाळीसगाव: तातडीची सूचना: 9 वर्षांची मुलगी हरवली; माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन
चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे गावातून 9 वर्षीय बालिकेचे अपहरण झाल्याची भीती; ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल तरवाडे, चाळीसगाव: चाळीसगाव तालुक्याला हादरवून सोडणारी एक घटना समोर आली आहे. तालुक्यातील तरवाडे येथील कु. धनश्री उमेश शिंदे (वय 9 वर्ष) ही बालिका काल, गुरुवार, दि. 12 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपासून बेपत्ता झाली आहे. धनश्रीचे अपहरण झाले असावे, अशी भीती व्यक्त केली जात आहे.