अंबडमध्ये खळबळ! मत्स्योदरी देवी मंदिराच्या गच्चीवर अज्ञात इसम आढळून आल्याने एकच गोंधळ अंबड शहरातील मत्स्योदरी देवी मंदिर परिसरात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. मंदिराच्या कळसाजवळील गच्चीवर ४५ ते ५० वयोगटातील एक अज्ञात इसम बराच वेळ थांबलेला आढळून आला. ही बाब लक्षात येताच संस्थेचे कर्मचारी डीगंबर खरात व नामदेव राठोड यांनी तातडीने ही माहिती मंदिर संस्थेचे व्यवस्थापक कैलास शिंदे यांना दिली. सन २०२२ मध्ये याच ठिकाणी घडलेल्या घटनेचा अनुभव लक्षात घेता, मंदिर प्रशासनाने कोणताही धोका न पत्क