धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडूळ बायपास जवळ टाटा टेम्पो व मळणी यंत्र घेऊन जाणाऱ्या वाहनाचा जबर अपघात झाला या अपघातात मळणी यंत्राचे दोन्ही चाक अक्षरशः रस्त्यावर निखळून पडले त्यामुळे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता सुदैवाने या अपघातात दोन्ही वाहनाचे चालक किरकोळ जखमी झाले आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील निखळलेले चाक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली