जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडल्यानंतर शिवसेना उबाठाचे नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खुलताबाद तालुक्यातील कागजीपुरा येथे भजे खाण्याचा आस्वाद घेतला. मतदान प्रक्रिया आणि प्रचाराचा धावपळीचा टप्पा संपल्यानंतर दानवे थेट स्थानिक वातावरणात मिसळले. साध्या चहाटपरीवर भजे खात त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. दिवसभराच्या राजकीय घडामोडीनंतरचा हा प्रसंग उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला