रामटेक शहराच्या पूर्व सीमेवर असलेल्या संत जगनाडे चौकातील लंबे हनुमान मंदिर परिसरात असलेल्या अत्याधुनिक प्रसाधनगृहात शुक्रवारच्या मध्यरात्री अज्ञाताने चोरी करून प्रसाधनगृहातील उच्च दर्जाचे लावलेले सामान चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पो. स्टे.रामटेक येथे याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. माहितीप्रमाणे राज्यमंत्री तथा आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र यांचे विशेष प्रयत्नातून 50 लाख रुपये लागतच्या पूर्णत्वास येऊन 15 जून 2025 ला लोकार्पित या अत्याधुनिक प्रसाधान गृहात ही चोरी झाली आहे.