आषाढी वारी दिवशी महूद पंढरपूर रस्त्यावर न्यू सातारा कॉलेजच्या समोर अपघात झाला आहे. यावेळी सांगोला विधानसभा शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी अपघातग्रस्त लोकांवर तात्काळ प्राथमीक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी पंढरपूर या ठिकाणी दाखल केले आहे. जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत. या घटनेची नोंद अद्याप सांगोला पोलीस ठाण्यात झालेली नाही.