वर्धा: नगराध्यक्षपदाची उत्सुकता!भाजपची वर्धा पालिकात १७ उमेदवारांची यादी जाहीर:दिग्गजांना तिकीट नाही;मंत्री डॉ भोयर यांच्य दबाव
Wardha, Wardha | Nov 16, 2025 वर्धा नगरपालिकेसाठी भाजपने आपली बहुप्रतिक्षित उमेदवारांची यादी अखेर घोषित केली.पहिली महत्त्वाची गोष्ट: तिकीट वाटपात नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली, तर काही दिग्गज नगरसेवकांना मात्र घरी बसावे लागले. यामुळे भाजपमध्ये नव्या-जुन्याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न दिसतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट: यादी निश्चित करताना पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांच्यावर मोठा दबाव होता.अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी चढाओढ केल्याचे स्पष्ट दिसत होते असे आज 16 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता प्रसिद्धीस दिले.