उदगीर बिदर रोडवर रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या मालवाहू ट्रकला आग लागल्याची घटना १० डिसेंबर रोजी रात्री साडे सात वाजेच्या दरम्यान घडली आहे, ट्रक मधील कॅबिन मध्ये स्फोट झाल्याने भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी हाकेच्या अंतरावर पेट्रोल पंप होता अग्निशमन जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले