साकोली: प्रगती कॉलनी येथे घरी कोणी नाही हे पाहून चोरट्यानी55हजार रुपयाचा मुद्देमाल केला लंपास,साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
साकोली येथील प्रगती कॉलनीत राहणारे आसिफ शेख हे नागपूरला पुतणीच्या लग्नासाठी गेले असता घरी कोणी नाही हे पाहून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील टीव्ही,सोन्याचांदीचे दागिने,नगदी5हजार रुपये असा एकूण 55 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.शुक्रवार दि.14 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता चोरी झाल्याची तक्रार आसिफ शेख यांनी साकोली पोलीस ठाण्यात केली असून अज्ञात चोरटेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे