मुकुंदवाडीत अल्पवयीन मुलांचा हैदोस; हातात कोयते घेऊन भररस्त्यात ओरडले 'मै हूँ डॉन'
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 6, 2026
छत्रपती संभाजीनगर : शहरातील रामनगर परिसरात दोन अल्पवयीन मुलांनी हातात कोयते घेऊन धिंगाणा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 'आम्ही डॉन आहोत डॉन' असे ओरडत या मुलांनी भरदिवसा महिला आणि शाळकरी मुलांना शिवीगाळ करत धमकावले. बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास १७ व १६ वर्षीय दोन अल्पवयीन मुले रामनगरमधील एका किराणा दुकानाजवळ उभी होती.