श्रीकृष्ण नगरात धक्कादायक घरफोडी! कुलूप गजाने तोडून चोरट्यांनी घर साफ केल्याची घटना.. अंबड शहरातील श्रीकृष्ण नगर परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीची धक्कादायक घटना घडली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. श्रीकृष्ण नगर येथे राहणारे रोहिदास मोतीलाल मासोळे (वय 41) हे गेल्या एक महिन्यापासून आजारी असल्याने संभाजीनगर येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. उपचारानंतर आरामासाठी त्यांची पत्नी व मुलगा नूतन वर्षात छोटी मत्स्योदरी शाळा जवळ राहणारे बंधू नंदू मोतीलाल मासोळे यांच्याक