मंगळवार तारीख तीन रोजी पैठण तालुक्यातील चितेगाव येथे एमआयएम पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली या प्रचार सभेत बोलताना माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले की एम आय एम पक्ष सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा पक्ष असून एमआयएम पक्षाने विविध जाती धर्माच्या उमेदवारांना संधी देऊन निवडून आणले आहेत तसेच आदर्श बँक घोटाळा प्रकरणी माझ्यावर तीन एफ आय आर दाखल झाले या प्रकरणी मी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी लढा दिला असेही त्यांनी यावेळी नमूद केले