राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विना नंबर प्लेट दुचाकींची वाढ होत असल्याची माहिती मिळताच, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली वांबोरी परिसरात मोठी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान सुमारे ४७ दुचाकी विना नंबर प्लेटच्या आढळून आल्या. संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, आवश्यक तपासणी करून त्या त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.