चाळीसगाव: मालेगावच्या 'यज्ञा'ला न्याय मिळावा! आरोपीला फाशीच्या मागणीसाठी चाळीसगावात 'निषेध' मोर्चा
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील सुवर्णकार समाजाची कु. यज्ञा जगदीश दुसाने या चिमुकलीवर झालेल्या अमानुष शारीरिक अत्याचार आणि निघृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या नृशंस कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि मृत बालिकेच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज चाळीसगाव शहरात सुवर्णकार समाजाने आणि अन्य सामाजिक संघटनांनी एकत्र येत भव्य निषेध मोर्चा काढला.