सिंधी बाजारातील गोमातेची वेळोवेळी तपासणी सुरू आहे, गौरक्षक व्यंकटेश भगत यांचे स्पष्टीकरण आजारी गाय प्रकरणावर गौरक्षकांचा खुलासा; डॉक्टरांच्या सल्ल्याने जागेवरच उपचार; 24 तास निगराणी असल्याचा दावा. आज दिनांक 14 रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील गजबजलेल्या सिंधी बाजार परिसरात गेल्या दोन दिवसांपासून आजारी अवस्थेत पडलेल्या गायीच्या संदर्भात सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला होता. सामाजिक कार्यकर्ता अमजद खान अकबर खान यांनी घटनास्थळी जाऊन गाईची पाहणी करत का