उमरी (ता. सावनेर, जि. नागपूर) येथे आज प्राथमिक आरोग्य केंद्र, केळवद यांच्या वतीने तसेच ग्रामपंचायत उमरी यांच्या सहकार्याने मोफत सर्वसाधारण आरोग्य तपासणी व विविध वैद्यकीय तपासण्यांचे भव्य शिबिर यशस्वीपणे पार पडले. या शिबिरामध्ये छातीचा एक्स-रे, नेत्र तपासणी, ईसीजी, रक्तदाब, शुगर तपासणी, HbA1c तसेच रक्त तपासणी अशा महत्त्वाच्या तपासण्या करण्यात आल्या