आज रविवार 7 डिसेंबर रोजी वेदांत नगर पोलिसांनी माहिती दिली की, सहा डिसेंबरला सकाळी साडेचार वाजता फिर्यादी जितेंद्र मोहन सिंग ठाकूर पोलीस हवालदार वेदांत नगर पोलीस ठाणे छत्रपती संभाजीनगर यांनी तक्रार दिली की, तीन डिसेंबरला सकाळी पाच वाजता परशुराम विठ्ठलराव सोळंके वय अठरा वर्ष छत्रपती संभाजीनगर याला तीन अज्ञात आरोपींनी कटरने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार पाठे पुढील तपास करीत आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.