भोकरदन: बस स्थानकावर विवस्त्र होत महिलेने केली बसेसची तोडफोड
आज दिनांक 10 फेब्रुवारी 2026 वार मंगळवार रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास भोकरदन बस स्थानकावर एका महिलेने विवस्त्र होत बसेची तोडफोड केली आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की सदर महिलाही हैदराबाद येथून बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी येथे जात असताना या महिलेने ही तोडफोड केली आहे ,त्यामध्ये विशेष बाब म्हणजे ही महिला मनोरुग्ण असून तिने अंगावरील सर्व कपडे काढून या बसेसची तोडफोड केली आहे,यावेळी त्या ठिकाणी उपस्थित झाले कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलवून सदर महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.