तेल्हारा: सिरसोली येथे गुप्तेश्वर भगवान यात्रोत्सव व नंदीश्वर शिवमहापुराण कथे निमित्त कलश मिरवणूक
Telhara, Akola | Apr 21, 2024 तेल्हारा तालुक्यातील सिरसोली येथे गुप्तेश्वर भगवान यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात नंदिकेश्वर शिव महापुराण कथा व कीर्तनांची मादियाळी राहणार आहे.शिरसोलीचे आराध्य दैवत असलेल्या श्री गुप्तेश्वर भगवान यात्रा महोत्सवात सात दिवस बाल व्यास कृष्णाजी महाराज दुबे यांची नंदीश्वर शिवमहापुराण कथा होणार आहे.यानिमित्त आज संध्याकाळी 5 वाजता सिरसोली येथे कलश मिरवणूक काढण्यात आली यावेळी सिरसोली व परिसरातील भाविक भक्त कलश मिरवणूकीत सहभागी झाले होते