बुलढाणा: शहरातील गजानन महाराज मंदिर येथे आमदार धिरज लिंगाडे यांच्या हस्ते नगरपरिषद निवडणूक प्रचार शुभारंभ
बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक १४ (अ) मधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे उमेदवार महादेवराव रामभाऊ शेळके व प्रभाग क्रमांक १४ (ब) मधील स्नेहल गजानन शेळके (राऊत )यांच्या प्रचाराचा शुभारंभ २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता गजानन महाराज मंदिरापासून झाला. यावेळी अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे,उबाठा प्रवक्त्या जयश्रीताई शेळके आदी उपस्थित होते.