संग्रामपूर: भिलखेड येथील 42 वर्षीय महिला हरविली
संग्रामपूर तालुक्यातील भिलखेड येथील 42 वर्षीय महिला 22 नोव्हेंबर रोजी हरविल्याची नोंद 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता तामगाव पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.भिलखेड येथील सौ शारद लक्ष्मण म्हैसणे ही 42 वर्षीय महिला कोणाला काही न सांगता हरविली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद तामगाव पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.