नागपूर ग्रामीण: हुडकेश्वर परिसरात भीषण अपघात;अज्ञात ट्रकची बोलेरो ला धडक, डब्लू सी एल कर्मचाऱ्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू
हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या प्रेरणा शाळेसमोरील पुलावर 30 नोव्हेंबरला सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात डब्ल्यूसीएल मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पत्नीच्या जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार डब्लू सी एल मध्ये कार्यरत अनिल कुमार सिंग व त्यांची पत्नी रुबी सिंग हे त्यांचे सहकारी गौरव पांडे आणि त्यांची पत्नी राशी पांडे यांच्यासह एका कार्यक्रमासाठी उमरेड येथे जात होते.