अकोला: शिष्यवृत्ती अर्जांची संख्या घट; विद्यार्थ्यांना तत्काळ अर्ज भरण्याचे आवाहन, सहायक समाजकल्याण आयुक्त मारोती वाठ
Akola, Akola | Nov 29, 2025 अकोला : भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रीशीप योजनांसाठी यंदा अनुसूचित जाती विद्यार्थ्यांचे अर्ज कमी झाल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षी 15,649 अर्ज नोंदले असताना यावर्षी केवळ 6,715 अर्ज प्राप्त झाले आहेत. महाडीबीटी पोर्टलवर जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू असून अनेक विद्यार्थ्यांनी अजून अर्ज भरलेले नाहीत. विद्यार्थ्यांनी विलंब न करता तत्काळ अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त मारोती वाठ यांनी दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्धीपत्रका द्वारे केले