मुक्ताईनगर: माणगाव येथे गांजाच्या शेतीवर एलसीबीची कारवाई; लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त
गांजाच्या शेतीवर एलसीबीची कारवाई; लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त मुक्ताईनगर तालुक्यातील माणगाव शिवारात केळीच्या बागेत अवैधपणे सुरू असलेली गांजाची लागवड जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि मुक्ताईनगर पोलिसांनी बुधवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता संयुक्त कारवाई करून पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.