बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथील दुधना नदीपात्रातून व्ही. पी. सेठी कन्स्ट्रक्शनच्या कंडारी येथील प्लांटसाठी विनापरवाना मुरुम उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.शनिवार दि. 10 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार महसूल प्रशासनाच्या कारवाईत चार हायवा व एक पोकलँड जप्त करण्यात आले असून जप्त मालमत्तेची किंमत सुमारे 1 कोटी 60 लाख 2 हजार 400 रुपये इतकी आहे. महसूल प्रशासनाला रामखेडा येथे अवैध उत्खननाची माहिती मिळाली होती.