लाखनी: लाखनी पुलावरील ड्रेनेज पाईप कोसळला; थोडक्यात बचावला इसमाचा जीव
लाखनी पुलावर घडलेल्या धोकादायक प्रकाराने नागरिकांच्या अंगावर शहारे आणले. पुलावरील ड्रेनेज पाईप अचानक कोसळला आणि त्या ठिकाणी उभा असलेला एक इसम थोडक्यात वाचला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या प्रकाराचा व्हिडिओ तेथील नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून 29 नोव्हेंबर सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. पुलाच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांनी प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची उपाययोजना करावी, अशी मागणी व्यक्त केली आहे.