अकोल्याच्या महानगरपालिकेतील जन्म–मृत्यू दाखला विभाग आज पहिल्याच दिवशी पूर्णतः वाऱ्यावर असल्याचे चित्र समोर आले आहे. महापालिकेकडून कार्यालय सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. दाखल्यांसाठी आलेल्या नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे काही संतप्त नागरिकांचा संताप व्यक्त केला जात आहे.