निफाड: मरळगोई खुर्द येथे लागलेल्या आगीत घर जळून खाक; ७ लाखांचे नुकसान
Niphad, Nashik | Nov 26, 2025 मरळगोई खुर्द येथे लागलेल्या आगीत घर जळून खाक; ७ लाखांचे नुकसान :- मरळगोई खुर्द येथील सुभाष विश्वनाथ घुगे यांच्या गट नंबर १७९ मधील घराला अचानक आग लागून मोठी आर्थिक हानी झाली. कांदा विक्रीतून आलेली व नवीन घर बांधणीसाठी जमा केलेली ३ लाख रुपये रोख रक्कम, तसेच पाच तोळे सोने, संसारोपयोगी साहित्य, शालेय साहित्य आणि महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. या आगीनंतर एकूण ७ लाखांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.