आर्णी: आर्णीत 126 उमेदवारांच्या नशिबाची पेटी सील
Arni, Yavatmal | Nov 28, 2025 आर्णी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम शिगेला पोहोचली असून मतदानाची तारीख जवळ आल्यानंतर आज दिनांक 28 नोव्हेंबरला आर्णी तहसील कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक विभागाकडून सर्व ईव्हीएम मशीनचे सीलिंग करण्यात आले. प्रभागनिहाय सीलिंग प्रक्रियेला सर्व प्रभागातील तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची उपस्थिती होती. आर्णी शहरात एकूण 11 प्रभाग असून नगराध्यक्ष पदासाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. तर 22 नगरसेवक पदांसाठी तब्बल 114 उमेदवारांचा संघर्ष रंगणार असून एकूण 126 उमेदवारांचे भविष्य आता सीलबंद