बुलढाणा: बुलढाणा नगराध्यक्ष पदाच्या वंचितच्या उमेदवाराने अर्ज घेतलं मागे
वंचित बहुजन आघाडीने बुलढाणा शहराच्या राजकारणात आज मोठा राजकीय स्फोट केला.नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेल्या संगिता अर्चित हिरोळे यांनी अचानक उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय समीकरण बदलले आहे.या सोबतच आज नगरसेवक पदाचे अपक्ष उमेदवार करण बेडवाल, निशांत येरमुले आणि सागर घट्टे यांनीही माघार घेतली आहे.