धर्माबाद: पानसरे चौक येथे शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने विराट सभा संपन्न ; माजी नगराध्यक्ष बेळकोणीकर यांनी घेतला भाजपचा समाचार
आज दि. 27 नोव्हेंबर रोजी धर्माबाद शहरातील पानसरे चौक येथे संध्याकाळी 7 ला नगर पालिका सार्वत्रिक निवडणूक 25 च्या अनुषंगाने शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने विराट सभा संपन्न झाली असून ह्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात शिवसेनेवर प्रेम करणारे तथा विशेष करून माजी नगराध्यक्ष ऍड. सुरेंद्र बेळकोणीकर यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती, यावेळी ऍड. बेळकोणीकर यांनी भाजपच्या अ व ब टीमचा चांगला समाचार घेतले असून त्यांनी केलेल्या भाषणाद्वारे श्रोते मात्र मंत्रमुद्ध झाले होते.