मेहकर: लोमकाळलेल्या विद्युत तारेने घेतला अंजनी बुद्रुक येथील शेतकऱ्यांचा जीव
डोणगावजवळील अंजनी बुद्रुक येथे २२ नोव्हेंबर रोजी शेतात लोंबकाळलेल्या विद्युत तारेमुळे ६५ वर्षीय शेतकरी बाळकृष्ण राजाराम खोडवे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.खोडवे सकाळी साडेपाचच्या सुमारास आपल्या शेतात स्प्रिंकलरचे शिप बदलण्यासाठी गेले होते. काम करत असताना ८ ते १० फुटांवर लोंबकाळलेल्या विद्युत तारेला लोखंडी स्प्रिंकलरची तोटी लागली आणि त्यांना जोराचा शॉक बसला. जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.