मुळशी: ताम्हिणी घाटात भीषण अपघात टळला; कार दरीत पडता पडता वाचली
Mulshi, Pune | Nov 3, 2025 ताम्हिणी घाटात मोठा अपघात टळल्याची घटना समोर आली आहे. वेगाने जात असलेली कार अचानक घसरली आणि दरीकडे लोटली जात होती, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि स्थानिकांच्या मदतीने कार दरीत पडण्यापासून वाचली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.