रेणापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शोभाताई आकनगिरे व सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भव्य सभा पार पडली. रेणापूर शहरातील बाजार मैदानात आयोजित या सभेत उपस्थित राहून भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.