नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी शहराच्या राजकीय समीकरणांना मोठी कलाटणी दिली आहे. राज्य सरकारमध्ये सहभागी असूनही महायुतीत योग्य स्थान न मिळाल्याने स्वबळावर मैदानात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागपूरकरांची लक्षणीय पसंती मिळवली आहे. १ लाख ६७ हजार मते मिळवत या निवडणुकीत अजित पवार गट शहरात तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.