सांगोला: ३० वर्षांपासून चालत असलेला व्यवसाय धोक्यात; शिवसेना शहरप्रमुख तुषार इंगळेंनी नगरपालिकेकडे केली विनंती
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शहरप्रमुख तुषार इंगळे यांनी सांगोला नगरपालिकेकडे ७ ऑक्टोबर दुपारी ४ च्या सुमारास निवेदन देत हातावरचे पोट असलेल्या एका व्यावसायिकास त्याच्या जागेवरून हटवू नये, अशी मागणी केली आहे. संबंधित व्यावसायिक गेल्या २५-३० वर्षांपासून त्या ठिकाणी व्यवसाय करून उपजीविका चालवत असून तो आधीच कर्जबाजारी आहे. अशा स्थितीत त्याला जागेवरून हटविल्यास कुटुंबाला आर्थिक फटका बसेल आणि तो अधिक अडचणीत सापडेल, अशी भीती इंगळे यांनी व्यक्त केली आहे.