भुसावळ नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध करण्यास सुरुवात केली असून, प्रभाग क्रमांक ५ 'ब' मधून भाजपचे उमेदवार परीक्षित बऱ्हाटे यांची अखेर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने बुधवारी १० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बऱ्हाटे यांचा विजय निश्चित झाला.