आज मंगळवार दोन डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड पैठण फुलंब्री खुलताबाद कन्नड वैजापूर या तालुक्यातील नगरपालिका निवडणुकांची मतदान आज रोजी होत असून त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली असून पोलीस अधीक्षक राठोड हे विविध मतदान केंद्र ला जाऊन भेट देऊन पाहणी करीत आहे, पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त विविध ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.